Breaking News
Home / Breaking News / विकास पुरुष बनले बेळगावसाठी भगीरथ

विकास पुरुष बनले बेळगावसाठी भगीरथ

विकास पुरुष बनले बेळगावसाठी भगीरथ
बेळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली 24 तास पाणी योजना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी पूर्ण  प करण्याचा विडा उचलला आहे बेळगाव साठी ही योजना स्वप्नवत असताना त्यांनी पुन्हा एकदा याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले असून, बेळगावकरांच्या हातातून निसटलेली 24 तास पाणी योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू केला आहे. विकासपुरुष अशी ख्याती असलेले आमदार पाटील हे आता बेळगावकरांसाठी 24 तास पाणी देणारे भगीरथ बनले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहरासाठी 24 तास अर्थात 24×7 पाणी योजना मंजूर झाली होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही योजना रद्द होऊन यासाठीचा निधी परत गेला होता परंतु अभय पाटील यांनी केंद्रीय मंत्री स्व. अनंत कुमार यांची ची भेट घेऊन त्यांच्यामार्फत केंद्र सरकारवर योजनेसाठी दबाव आणला होता दोन वर्षां पासून जागतिक बँकेचे अधिकारी व  शासकीय खात्यातील तेरा विभागाच्या सचिवांशी सातत्याने बैठका, सभा घेऊन ही योजना बेळगाव साठी किती महत्त्वपूर्ण आहे याची वेळोवेळी माहिती दिली होती.  त्यामुळेच बेळगाव करांसाठी ही योजना पुन्हा सुरू होणार आहे . 571.35  कोटी रुपये खर्चाची ही योजना तेरा वर्षे योजनेचा दुरुस्ती खर्च आणि त्यावरील अंमलबजावणी खर्च अशी 804 कोटी रुपयांची ही योजना बेळगावकरांसाठी पुन्हा मंजूर झाली आहे. यामुळे शहरातील सुमारे 85000 घरांना 24 तास पाणी मिळणार आहे. या योजनेचे कंत्राट लार्सन अँड टर्बो कंपनी ला देण्यात आले आहे उद्यापासून योजनेचा सर्वे सुरू होणार आहे.
या संदर्भातच रविवारी पाणी पुरवठा महामंडळ महानगरपालिका व स्मार्ट सिटी अधिकारी तसेच या योजनेचे कंत्राटदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली या बैठकीत आमदारांनी योजने बाबत सविस्तर सूचना केली आहे. बेळगाव शहरासाठी आवश्यक या निरंतर पाणी योजनेचा सर्व्हे पुढील सहा महिने होणार आहे यासाठी 900 किलोमीटर पाईपलाईन पंपिंग टँक ची निर्मिती करण्यात येणार आहे एका वर्षात 20,000 घरांना या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जाईल पुढील चार वर्षात शहरातील 85 हजाराहून अधिक घरांना चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचा संकल्प आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या कामाचा लवकरच अधिकृतपणे शुभारंभ होणार असून याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. योजनेला पुनर्रमंजुरी मिळाल्याने आ. पाटील यांनी स्वर्गीय अनंत कुमार यांचे विशेष विशेष स्मरण केले. याशिवाय या योजनेसाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा व सरकारी अधिकाऱ्यांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Check Also

ಧಾರವಾಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಬದಲಾದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿಗೂ ಎಫೆಕ್ಟ್…?

ಬೆಳಗಾವಿ -ಧಾರವಾಡ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು ಎನ್ನುವ ಬೇಡಿಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿಯೇ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ.ಜೊತೆಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಬದಲಿಸಿ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *